शासकीय नियम: मनसेकडून ईडीलाच नोटीस





माय नगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नियमाचे आणि कायद्याचे पालन करत ईडीच्या मुंबईतील कार्यालयात हजर झाले. त्यानंतर महाराष्ट्र सैनिक चवताळून उठले आहेत. राज ठाकरे यांच्या पाठी ईडीचा डाव आखून सत्ताधारी सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप महाराष्ट्र सैनिकांनी केला होता. रस्त्यावर देखील राडा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेण्यात आलेे होते.

मात्र त्यानंतर संतापलेल्या महाराष्ट्र सैनिकांनी समाज माध्यमांवर राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यावरच भडास काढली आणि काही क्षणात त्या अधिकाऱ्याने देखील बातम्या प्रसिद्ध होताच स्वतःचा प्रोफाइल डिलीट मारला. तसेे म्हटले तर अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटीस मिळाली की बऱ्याच नेत्यांना धडकी भरते. कारण केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या ईडीच्या विरोधात कोणी फार काही करू शकत नाही असा समज आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची ईडीने चौकशी केली. त्यावरून मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला. मात्र आंदोलन करण्याचे टाळले. त्यांना आता एक कायदेशीर मुद्दा मिळाला आहे. मुंबईत ईडीच्या कार्यालयाचा नामफलक हिंदी आणि इंग्रजीत आहे. शासकीय नियमानुसार स्थानिक भाषेत म्हणजे मराठीतही हा फलक असायला हवा. सर्व शासकीय कार्यालयांना तशी सक्ती आहे. परंतु ईडीने कायद्याचं सरळसऱळ उल्लंघन केले आहे. तसे न केल्यास दंडाचीही तरतूद आहे. याबाबत मनसेने मराठी भाषा विभागाकडे तक्रार केली आहे. तसेच ईडीलाही त्याची प्रत पाठविली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post