बिबट्याच्या हल्ल्यात वडनेर बुद्रुकला महिला ठार


माय नगर वेब टीम
पारनेर - तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथे शनिवारी पहाटे प्रात:विधीसाठी शेजारील डाळींबाच्या बागेत गेलेल्या राधाबाई कारभारी वाजे(वय ७०) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. राधाबाई वाजे या पहाटे घरामागील डाळिंबाच्या बागेत प्रात:विधीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी बिबट्याने त्यांच्यावर झडप घालून दूर ओढत नेले. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचे शीर आणि एक पाय शरीरापासून वेगळा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस व वनविभागाचे आधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यादरम्यान, ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती.

वडनेर, वाजेवाडी शिरापूर परीसरात गेल्या दोन तीन महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता. अनेक जनावरांना या बिबट्याने लक्ष्य केले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post