रानू मंडल यांना सलमानकडून 55 लाखांचं घर गिफ्ट ?





माय नगर वेब टीम
मुंबई - ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं गाणं ‘एक प्यार का नगमा है’ गाऊन एका रात्रीत रानू मंडल यांना प्रसिद्धी मिळाली. संपूर्ण जीवन गरिबीत काढल्यानंतर रानू मंडल यांचे जीवन आता पूर्ण बदललं आहे. रानू मंडल यांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक दिग्गजांनी रानूचे कौतुक केले, तर गायक हिमेश रेशमियाने रानूला आपल्या एका चित्रपटात गाणं गाण्याची संधी दिली. इतकंच नव्हे तर अभिनेता सलमान खाननेही रानूला मुंबईत 55 लाखांचे घर दिलं असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

रानू यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नसल्यामुळे त्या रेल्वे स्थानकांवर गाणे गाऊन तेथेचे आपले जीवन व्यतीत करीत होत्या. नेहमी अनेकांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या सलमान खानने रानू यांना देखील मदत केली आहे. सलमनाने डोक्यावर छत नसणाऱ्या रानू यांना 55 लाखांचे घर भेट म्हणून दिले असल्याचे म्हटले जात आहे. मात्र सलमानकडून या गोष्टीचा अद्याप खुलासा झालेला नाही. रानू यांच्या सुरेल आणि मधूर आवाजाने सलमानचे मन जिंकले असल्यामुळे त्याने रानू यांना घर भेट म्हणून दिले असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post