मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु; देशपांडे पोलिसांच्या ताब्यात






मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी राज ठाकरे आज चौकशीसाठी ईडीच्या कार्यालया हजर राहणार आहेत. आज होणाऱ्या चौकशीच्या पाश्वर्भुमीवर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
राज ठाकरेंची चौकशी झाल्यास रस्त्यांवर उतरू, असं म्हणत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात मनसेकडून ठाणे बंदचं आवाहनही करण्यात आलं होतं. तसेच अनेक आज कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयावर जाणार होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post