छोट्या दानवेंकडे भाजपने सोपवली ही जबाबदारी !




माय नगर वेब टीम
जालना -  केंद्रिय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांच्या खांद्यावर भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. संतोष दानवे पाटील यांना पक्षाने जालना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

विधानसभेच्या तोंडावर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून पक्षाने त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे. जालना जिल्ह्यात पक्षसंघटना बळकट करून भाजप कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्याचं बळ त्यांना आता द्यावं लागणार आहे.



संतोष दानवे जालन्यातल्या भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. यातच आता विधानसभेला त्यांना त्यांच्या मतदारसंघात स्वत:चा प्रचार आणि जालना जिल्हाध्यक्ष म्हणून जालना जिल्ह्यात इतर भाजप उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे.

दरम्यान, पक्षनेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल संतोष दानवे यांनी आभार मानले आहेत. तसेच दाखवलेला विश्वास आपण खरा करून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post