खळबळजनक...! भाजपाला आयएसआयकडून पैसा



माय नगर वेब टीम
नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी आता आणखी एक वादग्रस्त वक्‍तव्य केले आहे. देशात मुस्लिमांपेक्षा गैरमुस्लिम लोकच जास्त हेरगिरी करतात. तसेच पाकिस्तानची दहशतवादी संघटना आयएसआयकडून भाजप आणि बजरंग दल पक्ष चालवण्यासाठी पैसा घेते असा गंभीर आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे.


मध्यप्रदेशातील भिंड या गावी दिग्विजय सिंह यांनी हा आरोप केला आहे. यावेळी बोलताना सिंह यांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे आजपर्यंत जेवढे हेर अटक करण्यात आले आहेत ते भाजप, बजरंग दल आणि आरएसएसकडून पैसे घेतात असे म्हटले आहे. तसेच आयएसआयसाठी हेरगिरी करणारे मुस्लिम लोक कमी असून गैरमुस्लिम लोकच जास्त आढळतात असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला आहे. तसेच त्यांनीए ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला नाही त्यांनी आम्हाला देशभक्‍तीचे धडे देवू नये असे म्हणत भाजपवर टीका केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post