गणेशोत्सवाची धूम ; घरोघरी गणरायचे आगमन


माय नगर वेब टीम 
मुंबई - महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायचं आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी आगमन झालं. गणपती बाप्पा मोरया आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाचं आबालवृद्धांनी स्वागत केलं. श्रींची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या निमित्तानं अवघा महाराष्ट्र भक्तिरसात चिंब झाला आहे.
पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. राज्यातील घराघरांत तसेच मंडळांत गणेशाची स्थापना करण्यात येत आहे. राजकारणापासून ते चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या घरी गणेशाचे आगमन होत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाला पुण्यात झाली होती सुरुवात
महाराष्ट्रात गणेशोत्सवाची परंपरा जुनी आहे. जिजामाता यांनी पुण्यातील कस्बा पेठे गणपतीची स्थापना केली होती. सुरुवातीला गणेशोत्सव खासगी आणि कौटुंबिक उत्सवाच्या स्वरुपात साजरा करण्यात येत होता. 1893 मध्ये लोकमान्य टिळक यांनी याला सार्वजनिक रुप देत राष्ट्रीय एकतेचे प्रतीक बनवले. टिळकांनी या उत्सवाद्वारे लोकांना संगठीत करण्यास सुरुवात केली. जेणेकरून त्यांच्या या संगठनाचा उपयोग स्वातंत्र लढ्यात करता येईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post