शहरात रंगली श्रींची पारंपारिक मिरवणूक



मिरवणुकीत महिलांसह युवती फेटे बांधून सहभागी

माय नगर वेब टीम
अहमदनगर - खाकीदास बाबा मठ, लालटाकी येथील मोर्या प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी (दि.2 सप्टेंबर) शहरातून श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेची पारंपारिक पध्दतीने मिरवणुक काढण्यात आली. वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकित पुरुष पांढरे कपडे व फेटे तर महिला-युवती भगवे फेटे व गुलाबी साड्या परिधान करुन उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. गणपती बाप्पांच्या जयघोषकरीत निघालेल्या या मिरवणुकीने नगरकरांचे लक्ष वेधले. घोड्यांच्या रथात असलेली श्रीगणेशाची आकर्षक मुर्ती मिरवणुकीचे आकर्षण ठरली. लहान मुले भगवे ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी होते. बाप्पांच्या आगमनासाठी मिरवणुकीत सर्व महिला-पुरुषांनी संगीताच्या तालावर ठेका धरला होता. ही मिरवणुक मंडळाचे अध्यक्ष विशाल चत्तर, उपाध्यक्ष बाळासाहेब आगळे, गोपाळराव ढगे, चंद्रकांत मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post