नगरकर इकोफ्रेंडली गणेशोत्सवच्या तयारीत ; विद्यार्थ्यांनी साकारल्या इकोफ्रेंडली गणेश मूर्ती


माय नगर वेब टीम

अहमदनगर - पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनाने गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून इकोफ्रेंडली गणेश मुर्त्या साकारल्या. दप्तरमुक्त अभियानातंर्गत इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी गणपती बनवा कार्यशाळा मोफत ठेवण्यात आली होती. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणपती बनवित या मुर्त्यांची गणेशोत्सवात प्राणप्रतिष्ठापणा करण्याचा संकल्प व्यक्त केला.

शुक्रवार (दि.30 ऑगस्ट) रोजी शाळेच्या सभागृहात संस्थेचे ज्येष्ठ संचालक शरद क्यादर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे शुभारंभ झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव बाळकृष्ण सिद्दम, मुख्याध्यापक रावसाहेब क्षेत्रे, उपमुख्याध्यापक पांडूरंग गोणे, पर्यवेक्षक दिपक रामदीन, सरोजनी रच्चा आदी उपस्थित होते.

शरद क्यादर म्हणाले की, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मुर्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होतो. जलचरांना याची हानी पोहचत असून, यासाठी शाडूच्या मातीचे गणपती सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. हे गणपती घरच्या घरी विसर्जित करुन ते पाणी झाडाला टाकल्यास खर्या अर्थाने पर्यावरणाचे संवर्धन होणार असल्याची भुमिका त्यांनी मांडली.

शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याची चित्रफित विद्यार्थ्यांना गुरुवारी दाखविण्यात आली. कला शिक्षक नंदकुमार यन्नम व आशा दोमल यांनी सोप्या पध्दतीने गणपती बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लहान मुलांसह शिक्षकांनी देखील गणपती बनविण्याचा आनंद लुटला. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जयश्री मेहेर, रंजना गोसके, रेणुका खरदास, संदिप छिंदम, अनिता भाटिया, प्रमोद चन्ना, विष्णू रंगा, निलेश आनंदास, सुहास बोडखे, अजय न्यालपेल्ली, मथुरा आढाव आदी शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post