'ती' झेडपीची शाळा जलमय


विद्यार्थांचा जीव अन आरोग्य धोक्यात!

माय नगर वेब टीम

अहमदनगर- राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील वने-घेरुमाळ वस्ती जिल्हा परिषद शाळेसमोरून तीन दिवसांपासून पाणी वाहत आहे. परिणामी वर्गात जाताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. तर, खेळाचे मैदानच जलमय झाल्याने मुलांना दिवसभर वर्गात एकाच जागी ठाण मांडून बसण्याची नामुष्की ओढविली आहे. अगोदरच ईमारतीअभावी शाळेच्या पटांगणात अंगणवाडी भरते. मात्र, पाण्यामुळे बालकांना बसण्यास जागा शिल्लक नाही. त्यात साचलेल्या पाण्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

एखादा दमदार पाऊस पडला. त्यात कालव्यास पाणी सुरू असल्यास ओढा ओहरफ्लो होवून रस्त्यावरून पाणी शाळेच्या प्रागणात साचते. मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारतीची गतवर्षी नव्याने दुरुस्ती करण्यात आली. मात्र, आता अधिक दिवस पाणी वर्ग खोल्याभोवती साचून राहिल्यास चांगल्या ईमारतीची झिज होवून भविष्यात एखादी दुर्घटना होण्याची भिती शिक्षक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामूळे शाळेत येणाऱ्या पाण्यास जबाबदार रस्त्याच्या बाजूस असलेले गटार बुजविणारे की रुंद असलेले ओढे अरुंद करणारा माणूस की अधिक पडणारा पाऊस ? का आणखी कोण असा प्रश्न शिक्षण घेणाऱ्या चिमुरड्या मुलांना पडला आहे. त्यासाठी तात्काळ उपाययोजना करून गटार किंवा नळ्या टाकून पाण्याचा प्रवाह बदलाची गरज आहे. याकडे पालकांसह प्रशासनाने लक्ष घालून दरवर्षी पावसाळ्यात होणारी अडचण दूर करावी अशी विनवणी शिक्षक व विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. अन्यथा दुर्देवी घटना घडल्यास नवल वाटायला नको.




नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खुला करू
सदर शाळेची पाहणी करून कार्यवाही करू, नेसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलणे किंवा अडविणे चुकीचे आहे. असे आढळून आल्यास तो खुला करण्यासाठी प्रयत्न करू. फसोद्दीन शेख तहसिलदार, राहुरी

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post