'या' योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आधार लिंकिंगसाठी 30 नोव्हेंबरपर्यत मुदत
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजने अंतर्गत दिनांक 1 ऑगस्ट 2019 पासून पात्र लाभार्थ्यापैकी डाटा आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार होता. तथापी मोठया प्रमाणात डाटा आधार लिंकिंग प्रलंबित असल्याने बरेच लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने केंद्र शासनाने लाभार्थ्याचा डाटा आधार लिंक करण्यासाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2019 पर्यत मुदत दिलेली आहे. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
दिनांक 1 डिसेंबर 2019 पासून पात्र लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणारे सर्व हप्ते आधार लिंक आधारीतच करण्यात येणार आहेत. त्याकरिता पी.एम किसान पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांना आधार प्रमाणे नावे दुरुस्त करण्यासाठी Farmers Corner मध्ये Edit Aadhaar Failure Records ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सूविधेमार्फत योजनेच्या लाभार्थ्यांना पोर्टलवर जाऊन स्वतः त्यामध्ये दुरुस्ती करता येईल.तसेच http://www.pmkisan.gov.in/Home.aspx या संकेतस्थळावर CSC LOGIN हया सुविधेमध्ये "आपले सरकार केंद्र" मार्फत लाभार्थ्यांना आधार दुरुस्ती व इतर सर्व सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
आपले सरकार केंद्रामार्फत लाभार्थी आधार आधारीत माहिती पीएम किसान पोर्टलवर सुधारीत करु शकतील. या योजनेस पात्र असलेले परंतू आधार आधारीत माहिती दुरुस्ती करावयाचे प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2019 पूर्वी दुरुस्ती करुन घ्यावी असे जिल्हा समन्वय अधिकारी (पीएम किसान) तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
Post a Comment