माय नगर वेब टीम
अहमदनगर
अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिला गर्भवती ठेवले. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे ही घटना घडली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्रकाश दुर्योधन गांगुर्डे (रा. कन्नड, जि. औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी दुपारी घरी एकटीच असल्याचे माहित असताना आरोपीने तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर दोन-तीन वेळा बळजबरी बलात्कार केला. तसेच मुलीला गरोदर ठेवले. याबाबत मुलीने जर कोणाला सांगितले, तर तिला जिवंत ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रकाश गांगुर्डे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment