शाळेत मुलांनी भरविला आठवडे बाजार


माय नगर वेब टीम

अहमदनगर - नगर तालुक्यातील अरणगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये इ १ ली इ.४ थी च्या विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार भरविला. त्यास ग्रामस्थ व पालकांनी मोठा प्रतिसाद दिला.

मुलांना शाळेत फक्त पुस्तकी ज्ञान देऊन चालत नाही त्यामुळे मुख्याध्यापक दिलीप दहिफळे व इतर शिक्षकांनी मुलांना व्यावहार ज्ञान देण्यासाठी शाळेमध्ये आठवडे बाजार भरविला होता. सकाळी 8 वाजता सुरु झालेला बाजार 11 वाजतेपर्यंत चालला. यात मुलांना आपापल्या शेतात आणलेला भाजीपाला, कांदे, बटाटे, हिरवी मिरची, कोथंबिर, मटकी, गवतीचहा, वांगी, पालक, मेथी, गवार यांसह खाद्यपदार्थ भेळ, वडापाव, चहा, बिस्कीट, इडली सांबर असे विविध पदार्थ घेऊन बाजारात बसली होती. ते खरेदी करण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी सरपंच सौ. स्वाती गहिले, सौ.आजबे, सौ.गहिले, रेखा दळवी, मोहन पुंड, दत्ता कल्हापुरे, लहु आजबे, बाबु पुंड, फसले, राम जाधव, नवनाथ बिडवे, संजय खंडागळे, उमेश जाधव, बाळु शिंदे, सुनील निमसे यांसह पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी हजेरी लावली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post