फिरोदिया फाऊंडेशनच्या खेळाडूंचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश
सब ज्युनिअर एशियन चॅम्पीयनशीप मध्ये धनश्री फंडला रौप्य तर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भाग्यश्री फंडला सुवर्ण आणि संजना बगाडीला कास्यपदक
माय नगर वेब टीम
अहमदनगर - शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरीअल फाऊंडेशनने पालकत्व स्विकारलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील महिला कुस्तीपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत घवघवीत यश संपादन केले आहे. सब ज्युनिअर एशियन चॅम्पीयनशीप कुस्ती स्पर्धेत धनश्री फंड हिने रौप्य तर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भाग्यश्री फंड ने सुवर्ण तसेच संजना बगाडी हीने कास्यपदक पटकावून जिल्ह्यासह फाऊंडेशनचे नांव उंचावले आहे.
या महिला कुस्तीपटूंना फाऊंडेशनच्या वतीने नरेंद्र फिरोदिया यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील महिला कुस्तीपटू संपुर्ण भारतासह परदेशात देखील आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहे. जिल्ह्याला कुस्ती क्षेत्राचा मोठा वारसा असून, महिला कुस्तीपटूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अशा गुणी खेळाडूंच्या पाठिशी आपण सदवि उभे असून फाऊंडेशनच्या माध्यमातू त्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चीन मध्ये झालेल्या सब ज्युनिअर एशियन चॅम्पीयनशीप कुस्ती स्पर्धेत 15 वर्षाखालील वयोगटात धनश्री फंड हिने रौप्य पदकाची कमाई केली. तसेच दिल्ली येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भाग्यश्री फंड हीने 17 वर्षा आतील 61 किलो वजनगटात सुवर्ण पदक तर संजना बगाडी हीने 73 किलो वजनगटात कास्य पदक पटकाविले आहे.
Post a Comment