आंतरशालेय स्पर्धेचा मानाचा करंडक बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेने पटकावला
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कै.बाई इचरजबाई फिरोदिया स्मरणार्थ सर्वाधिक बक्षिसे मिळविणा-या शाळेला देण्यात येणारा आंतरशालेय स्पर्धेचा मानाचा करंडक पहिल्याच वर्षी बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेने पटकावला आहे.
कै. बाई इचरजबाई फिरोदिया स्मरणार्थ आंतरशालेय स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय बोरा व कल्पनाताई बोरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमा प्रसंगी संजय बोरा म्हणाले की 'मुलांनी शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे व तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त अध्यापनात उपयोग होत असतो त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. शिक्षक आपल्याला घडवीत असतात. त्यांच्याकडे लक्ष द्या' असा बहुमोल संदेश त्यांनी सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना दिला. त्यांनतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मीना पवार यांनी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी गायन,नृत्य,कथाकथन ,प्रश्नमंजुषा,चित्रकला, फॅन्सी ड्रेस, रांगोळी, या विषयी या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दि.१६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१९ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत एकण २२ शाळा व ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे सर्वाधिक बक्षिसे मिळविणा-या शाळेला देण्यात येतो या पहिल्याच वर्षी हा बहुमान व करंडक बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेने पटकविला त्याबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मीना पवार यांनी स्पर्धकांचे कौतुक केले व फिरता चषक प्रशालेला मिळाला. त्याचबरोबर अपयशाने खचून न जाता जास्तीत जास्त प्रयत्न करा व अपयश मिळाले म्हणून खचून जाऊ नका असा बहुमोल संदेश त्यांनी आपल्या अहवाल वाचनात दिला.
या प्रसंगी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन स्पर्धकांचे कौतुक केले. याप्रसंगी शाला समिती सदस्य गौरव मिरीकर, सुनंदाताई भालेराव, भुषण भंडारी, शैलेश मुनोत, सौ.पुष्पा फिरोदिया, अ.ए.सोसायटीच्या शाळांचे मुख्याध्यापक विजय कदम, सौ ज्योत्स्ना भणगे, सौ. वनिता गोत्राळ, सौ. पुष्पा पाचंगे व परीक्षक म्हणून विवेक नरसाळे, प्रतिप दहिफळे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसाद शिंदे यांनी केले, मान्यवरांचा परिचय सौ. मनिषा कांबळे , यादीवाचन पराग विलायते व आभार प्रदर्शन लिना डोंगरदिवे यांनी केले. व विविध गुणदर्शनाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली व कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment