नागरिकांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध


नगरसेवक विनित पाऊलबुधे; साईदिप नगर येथे बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ

माय नगर वेब टीम

अहमदनगर - विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुराव्याची आवश्यकता असते. आम्ही चारही नगरसेवक एकदिलाने महापालिकेकडे व आ.संग्राम जगताप यांच्याकडे विकास कामासाठी पाठपुरावा करतो. प्रभाग क्र. २ हा नवीन वसाहत निर्माण होणारा भाग. या भागामध्ये मुलभूत प्रश्नापासून कामाला सुरुवात करावी लागते. आम्ही सर्वांनी मिळून प्रभागाच्या विकासकामाचा आढावा घेत प्रभागाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार प्रभागातील कामे टप्प्याटप्प्याने पुर्ण करणार असल्याचे प्रतिपादन नगरसेवक विनित पाऊलबुधे यांनी कले.

प्रभाग क्रमांक २ मध्ये साईदिप नगर येथे बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ शारदा दराडे यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेवक विनित पाऊलबुधे, नगरसेविका रुपालीताई वारे, संध्या पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक निखिल वारे, कुंदा मुरदारे, शुभांगी पाटील, अनिता चौधरी, हिरा शिदोरे, लता लोखंडे, सुमन मुळे, अनिल सुर्यवंशी, राजाराम पाटील, त्रिंबक दराडे, प्रभाकर लोखंडे, म्हातारदेव खाडे, दिलीप मुरदारे, माणिक हापसे, विनित मुळे, डॉ.गणेश हिगे, दिलीप बोरा, अनिल शिदोरे आदी नागरिक उपस्थित होते.

यावेळी निखिल वारे म्हणाले की, विकासकामे करत असताना नागरिकांचे सहकार्य आवश्यक असते. जमीनी अंतर्गत सर्व कामे केल्यानंतर डांबरीकरणाचे कामे होतील. पुन्हा-पुन्हा कामे करण्याची गरज पडणार नाही. प्रभाग क्रमांक २ चा विकास कामातून कायापालट होणार आहे. पुढील पाच वर्षामधील सर्व विकासकामे मार्गी लागणार आहे. प्रभागाबरोबर उपनगराच्या विकास कामासाठी आम्ही सर्व नगरसेवक एकदिलाने काम करणार आहे. नगर शहराचे उपनगरे हे नियोजन पुर्वक सुंदर स्वच्छ उपनगरे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे असे ते म्हणाले.

माजी नगरसेवक बाळासाहेब पवार म्हणाले, प्राथमिक विकास कामाबरोबर उपनगराध्ये तपावेन रोड परिसरामध्ये सुंदर असे गार्डन तयार करायचे आहे. तसेच आरोग्याची सेवा मिळावी यासाठी या भागात मनपाचे सुविधा युक्त हॉस्पिटल व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणार आहे. विकासाची संकल्पना जनतेसमोर मांडणार आहे असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post