कांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी नेप्ती उपबाजार समितीत रोटेशन पद्धतीने लिलाव
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर-
नेहमीच शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेणार्या नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने नेप्ती येथील कांदा लिलाव शनिवार दि. 30 नोव्हेंबरपासून रोटेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला असल्याची माहिती सभापती विलास शिंदे व उपसभापती रेशमाताई रेवणनाथ चोभे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कांदा लिलाव रोटेशन पद्धतीने करण्याबाबत अनेक दिवसापासून नगर बाजार समितीचे संचालक मंडळ विचार करत होते. यासाठी संचालक मंडळाने नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजार, राहुरी बाजार समितीला भेट देवून तेथील लिलाव पद्धतीची समक्ष पहाणी केली. त्यानंतर नगर बाजार समितीच्या नेप्ती येथील कांदा लिलावही रोटेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी बाजार समितीने हमाल, मापाडी, आडते, व्यापारी व कर्मचारी यांची बैठक घेवून विविध अडचणीवर चर्चा केली. समितीच्या नेप्ती मार्केटमध्ये होणार्या कांदा लिलावाध्ये सुसुत्रता आणणेसाठी चर्चा करण्यात आली. सध्या नेप्ती मार्केमटध्ये 103 आडते व्यवहार करत असून एकूण 117 मापाडी असल्याबाबत सचिव यांनी सांगितले. सद्यपरिस्थितीत आडत्यांच्या पद्धतीनेच लिलाव सुरू असून एकाच वेळी अनेक ठिकाणी आडते लिलाव चालू करतात. त्यामुळे खरेदीदाराला प्रत्येक ठिकाणी लिलावास उपस्थित राहाता येत नाही. यामुळे कांदा लिलाव रोटेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार शनिवार दि. 30 नोव्हेंबरपासून नेप्ती कांदा मार्केटमध्ये रोटेशन पद्धतीने लिलाव होणार असल्याची माहिती सभापती विलास शिंदे यांनी दिली.
यावेळी संचालक बाळासाहेब निसे, अभिलाष घिगे, बाबासाहेब जाधव, वसंतराव सोनवणे, शिवाजी कारले, संतोष म्हस्के, बबनराव आव्हाड, हरिभाऊ कर्डिले, दिलीप भालसिंग, उद्धव कांबळे, संतोष कुलट, राजेंद्र बोथरा, भैरवनाथ कोतकर, जगन्नाथ मगर, संदीप कर्डिले, कानिनाथ कासार, रावसाहेब साठे उपस्थित होते.
दरम्यान, रोटेशन पद्धतीने लिलाव होणार असल्याने शेतकर्यांनी विक्रीस आणलेल्या कांद्याला चांगला भाव मिळणार असून शेतकर्यांनी लिलावाच्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत कांदा विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे संचालक संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, अभिलाष घिगे यांनी केले आहे. एकाच वेळी सहा ठिकाणी लिलाव सुरु होणार असल्याने शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव ळिणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कांदा लिलाव होण्या अगोदर 15 मिनिटं सायरन वाजवले जाणार आहे असे संचालक संतोष म्हस्के यांनी सांगितले.
Post a Comment