नवरा बायोकीची विहिरीत उडी मारून जीवन संपविले




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - वाल्मिकी दांम्पत्य हे भिंगार परिसरातील इंद्रनगर परिसरातील रहिवासी आहे. रविवार (दि. 24) रात्री पासून हे दांम्पत्य गायब होते. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत भिंगार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. भिंगार येथे बुर्‍हानगर रोडवरील लष्करी हद्दीत असलेल्या एका शेतातील विहिरीत शुक्रवारी (दि. 29) सकाळी कसला तरी वास येत असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले, तर त्यांना विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. सुरक्षा रक्षकाने तातडीने याबाबतची माहिती भिंगार कॅम्प पोलीसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. भिंगार पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान दाम्पत्यांने आत्महत्या का केली? हे मात्र समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा शोध घेत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post