'पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपसोबत चला'
अजित पवारांचा शरद पवारांना निरोप
माय नगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रातल्या राजकारणातला सगळ्यात मोठा राजकीय भूकंप आज पाहण्यास मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला असा निरोप अजित पवार यांनी आमदरांकरवी शरद पवार यांना पाठवला असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समजते आहे. अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून आज थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार यांच्या शपथविधीनंतर वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली. या बैठकीत कालपासून संपर्कात नसलेले धनंजय मुंडे आल्यानंतर सगळ्यांनाचा आश्चर्य वाटले. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. उलट अजित पवार यांनी याच बैठकीत पक्ष वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला हा निरोप शरद पवारांना पाठवल्याचे समजते आहे.
Post a Comment