राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी जयंत पाटील यांची निवड
माय नगर वेब टीम
मुंबई - अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.अजित पवार यांनी बंड केल्याने पक्षाने त्यांच्यावर ही कारवाई केली. आतात्यांच्याऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंतपाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदीनिवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी नेत्यांच्याबैठकीत प्रसिद्धीपत्रक जारी करतहा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांची विधीमंडळ गटनेता पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर त्यांच्याऐवजी जयंत पाटील यांची निवड करण्यात आली.
Post a Comment