पवारांना समर्थकांसह आमदारांचे बळ; ‘पवार साहेब तुम आगे बढो’च्या घोषणा
माय नगर वेब टीम
मुंबई : दिवसभराच्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमधून बाहेर पडले. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बाहेर येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ‘पवार साहेब तुम आगे बढो’च्या घोषणा दिल्या. सुप्रिया सुळे यांनी समर्थकांना अभिवादन केलं आणि त्या शरद पवारांसह रवाना झाल्या.
वायबी सेंटरबाहेर सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली होती. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
Post a Comment