पर्यावरण संरक्षणासाठी 157 देशांतील लाखो विद्यार्थी उतरले रस्त्यावर
माय अहमदनगर वेब टीम
लंडन : जगभरात पर्यावरण संरक्षणाच्या मोहिमेने शुक्रवारी पुन्हा जोर धरला आहे. १५७ देशांतील २४०० शहरांत लाखो विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालये सोडून पर्यावरण जागरूकतेसंबंधी रॅलीही काढण्यात आल्या. त्याचबरोबर सरकारने याबाबत तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. स्पेनमध्ये २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या यूएन कॉप-२५ संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन महत्त्वाचे मानले जाते. फ्रायडेज फ्यूचर मोहिमेत ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, चीन, फ्रान्स, इंडोनेशिया, इटली, दक्षिण कोरिया व भारतासह अनेक देशांतील विद्यार्थ्यांनी सरकारी इमारती व ऐतिहासिक ठिकाणीही या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेतले. ब्रिटनच्या सर्व शहरांत विद्यार्थी व तरुणांनी मोर्चा काढला आणि पुुढील महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत त्यात महत्त्वाचा मुद्दा बनवण्याचीही मागणी केली. ऑस्ट्रेलियाच्या विद्यार्थ्यांनी वणव्यावर नियंत्रण मिळवण्यात आलेल्या अपयशामुळे नाराजी व्यक्त केली. त्यांनी संसद व लिबरल पार्टीच्या मुख्यालयास घेराव घातला. जपानमध्ये टोकियो, क्यूडो, आेसाकामध्येही विद्यार्थ्यांनी विराेध दर्शवला. बर्लिनमध्ये पर्यावरण कार्यकर्त्यांनी स्प्री नदीत उतरून सरकारच्या पर्यावरण धोरणांवर टीका केली.
अंटार्क्टिकाच्या शेटलँड बेटावर यंदा ८० हजार पर्यटकांची गर्दी झाली होती. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के जास्त आहे. पेंग्विनच्या सोबतीने पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची या बेटाला पसंती आहे. दरवर्षी पेंग्विनच्या संख्येत २५०० ने घट होत आहे.
Post a Comment