नगर-पुणे महामार्गावर अपघात ; दोघे जागीच ठार
माय अहमदनगर वेब टीम
पारनेर - नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील पळवे फाटा येथील हॉटेल जगदंब जवळ कारच्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७.१५ वाजता घडली.
याबाबत सुपा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुण्यावरून अहमदनगर कडे जाणाऱ्या महामार्गावरील पळवे फाटा हॉटेल जगदंब जवळ एम एच-०४,बी वाय-९६२२ हुंडाई कंपनीच्या कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून पुलाला धडक देऊन कार दरीत कोसळल्याने प्रतीक ललित कुमार राठोड राहणार- खडक मला चौक तळेगाव दाभाडे, नमन कोठारी रा. बेंगलोर या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयतांना बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पारनेर येथील रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली असून यादरम्यान वाहनांच्या दुतर्फा लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलीसांनी वाहतूक सुरळीत चालू केली.
शनिवारी दुपारी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस करत आहेत.
Post a Comment