विकासकामांबरोबरच धार्मिकतेचा वारसा लोकप्रतिनिधींनी जोपासावा
ह.भ.प. तुळशीराम लबडे महाराज ; प्रभाग क्र.२ मध्ये चौक सुशोभिकरण कामाचा शुभारंभ
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोणतेही चांगले काम करायचे असेल तर चांगल्या विचारांची, धार्मिकतेची, संस्काराची व एकीची आवश्यकता असते. तेव्हाच ते काम मार्गी लागते. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येवुन विकासाची गुढी उभारावी. प्रभाग क्र.२ चे चारही नगरसेवक सर्वांना एकत्र घेवून काम करत आहे. तसेच विकासकामाबरोबर प्रभागामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. धार्मिकतेचा वारसा प्रत्येकाने जोपासला पाहिजे. असे प्रतिपादन ह.भ.प. तुळशीराम लबडे महाराज यांनी केले.
प्रभाग क्र.२ मध्ये आ.संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून बाजाबाई सोसायटी परिसरातील चौक सुशोभिकरण कामाचा शुभारंभ हभप तुळशीराम लबडे महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नगरसेवक विनित पाऊलबुधे, नगरसेविका संध्याताई पवार, नगरसेविका रुपालीताई वारे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, मा.नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, दादासाहेब खांदवे, आ.एम.पवार, श्री.विधाते, विक्रम कासार, बाळासाहेब वामन, शेषराव शिंदे, मधुकर वाघ, देविदास बुधवंत, विकास जगताप, विठ्ठल घोरपडे, व्यंकटेश बुटला, सौ.गुंजाळ, सौ.तिवारी आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका संध्या पवार म्हणाल्या, विकासाची संकल्पना घेऊन प्रभागामध्ये आम्ही काम करत आहोत. विकास कामाबरोबर महिलांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही मनपाकडे पाठपुरावा करणार आहे. महिलांमध्ये आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी महिलांना एकत्र करणार आहे.
नगरसेविका रुपालीताई वारे म्हणाल्या की, प्रभागाच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त होणार आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. महिलांच्या हाताला काम मिळावे यासाठी बचत गटाची स्थापना करणार आहे. या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे.
Post a Comment