युवकांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर व महापरीक्षेचे आयोजन


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - युवक-युवतींना स्पर्धा परिक्षांचे योग्य मार्गदर्शन उपलब्ध होण्यासाठी गरुड झेप करिअर अकॅडमीच्या वतीने शहरात मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर व महापरीक्षेचे एकाचवेळी आयोजन करण्यात आले आहे. युवकांना शासकीय नोकरीमध्ये मोठ्या प्रमाणात संधी असून, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन अकॅडमीचे प्राध्यापक आशीर्वाद चव्हाण यांनी केले आहे.

गुरुवार दि.5 डिसेंबर रोजी सावेडी येथील माऊली सभागृहात या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर व महापरीक्षेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अप्पर पोलीस अधिक्षक सागर नेताजी पाटील व संचालक प्रा. एस.एस. सोनवणे हे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी अनेक प्रेरणादायी व्याख्याते विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. सदर शिबीर व परीक्षा विनामुल्य ठेवण्यात आली असून, प्रथम येणार्‍या तीन विद्यार्थ्यांस अनुक्रमे 11 हजार, 7 हजार आणि 5 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह तसेच आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांना सकाळी 8 वाजता उपस्थित रहावे. परीक्षा संपताच मार्गदर्शन शिबीर होणार आहे. या शिबीरात सहभागी होण्यासाठी 7721888802, 7721888803 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post