"ती" गाडी फेकतेय शाळेच्या गेटमध्ये चॉकलेट ; विद्यार्थ्यांसह ग्रामस्त भेदरले



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील खडकी येथे प्राथमिक शाळा आणि हायस्कूल शेजारी शेजारीच आहे. या आठवड्यात सोमवारी आणि गुरुवार या दोन्ही दिवशी अज्ञान वाहनातून चॉकलेट फेकण्यात आले. त्यामुळे मुलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या वाहनाचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी खडकी ग्रामस्थांनी केली आहे.

खडकी ता.नगर गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते चौथी पर्यंत असून त्यात १२५ विद्यार्थी शिक्षण घेतात. शेजारीच रयत शिक्षण संस्थेचे श्री तुळजा भवानी विद्यालय आहे. ते पाचवी ते दहावी पर्यंत असून तेथे ३२९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सोमवार दि.२५ नोव्हेंबर आणि गुरुवार दि.२८ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड च्या सुमारास शाळेची सुट्टी होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या अज्ञात चारचाकी वाहनातून शाळेच्या गेट मध्ये चॉकलेट फेकण्यात आले. सोमवारी ही बाब लक्षात येताच शिक्षकांनी ते चॉकलेट गोळा करून फेकून दिले व विद्यार्थ्यांना असे काही न खाण्याच्या सूचना दिल्या. पण गुरुवारी ही घटना दुसर्यादा घडल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये घबराट पसरली आहे.शिक्षकांनी ही बाब ग्रामस्थांच्या कानावर घातली असून या वाहनाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खडकी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत प्राथमिक शाळा , हायस्कूल आणि ग्रामपंचायत च्या वतीने नगर तालुका पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात येणार आहे.


सीसीटीव्हीत गाडी कैद
प्रशालेच्या प्रांगणात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. आज दुपारी पावणे दोन वाजता एक गाडी शाळेच्या दरवाजातून जाताना आणि काहीतरी फेकताना दिसून येत आहे. ज्या गाडीतून चॉकलेट फेकले आणि सुसाट वेगात गाडी निघून गेली ती गाडी काही विद्यार्थ्यांनीही पहिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post