राजकारणात पुन्हा भूकंप ; अजित पवार यांनी दिला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा



माय नगर वेब टीम

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शपथविधीनंतर अवघ्या तीन दिवसातच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवारांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाचा पेच भाजपसमोर उभा राहिला आहे.

शनिवारपासून काय काय घडलं?

शनिवारी सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

अजित पवार यांनी जे केलं तो त्यांचा व्यक्तीगत निर्णय हे ट्विट शरद पवार यांनी केलं

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्यावर टीका

विधीमंडळ नेतेपदावरुन अजित पवारांची हकालपट्टी करण्यात आली

अजित पवारांऐवजी जयंत पाटील यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली

अजित पवार यांनी ट्विट करुन आपण राष्ट्रवादीतच असल्याचं म्हटलं

रविवारीही दिवसभर अनेक कार्यकर्ते आणि नेते अजित पवारांना भेटले

अजित पवारांनी परत यावं यासाठी प्रयत्न सुरुच होते

सोमवारीही अजित पवारांना राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि जयंत पाटील भेटले

अजित पवार हे त्यांच्या भूमिकेवर सोमवारपर्यंत ठाम होते

मंगळवारी अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिला

महाराष्ट्रातल्या राजकारणातला हा सगळ्यात भूकंप आहे असंच म्हणावं लागेल. २३ तारखेला अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा भाजपाला मोठा धक्का मानला जातो आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post