राष्ट्रीय स्तरावर संघटन असेल तर कायदे करण्यास सरकारला भाग पाडू- अण्णा हजारे


माय नगर वेब टीम
पारनेर - कार्यकर्त्यांचे संघटन असेल तर सर्व शक्य आहे. संघटनेच्या माध्यमातून आज अनेक कायदे झालेले आपण पहात आहात. हे कायदेच संघटन करू शकतात.म्हणून राष्ट्रीय स्तरावर संघटन असेल तर सरकारला कायदे करण्यास भाग पाडू असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

राळेगणसिद्धी येथे राष्ट्रीय आंदोलन समिती संयोजिका कल्पनाताई इनामदार द्वारे आयोजित राष्ट्रीय आंदोलन परिषदेचे उद्घाटन पद्मभूषण अण्णा हजारे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

हजारे म्हणाले, पक्ष आणि पार्ट्यां ह्यामुळे देशाचे भवितव्य होणार नाही. पक्ष पार्टीतंत्रामुळे आज देश धोक्यात आहे. सामान्य जनतेसाठी त्यांचे योगदान काय? पक्ष, पार्ट्या स्वार्थासाठी असतात हे आज आपण राज्यातील स्थितीवरून पहातच आहात. यामुळे निवडणूक चिन्ह हटविण्यासाठी यापुढे अधिक जोमाने काम करावे लागेल. यासाठी लवकरच राज्यांचा दौरा करणार असून संघटन वाढवून प्रचार, प्रसार करणार असल्याचे यावेळी अण्णा हजारे म्हणाले.

यावेळी देशभरातील संघटनांमध्ये महिला संघटनाही तितक्याच महत्वाच्या असल्याचे मत कार्यक्रमाच्या संयोजिका कल्पनाताई इनामदार यांनी व्यक्त केले. संघटन उभे करताना अण्णांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. यानंतरची दुसरी आंदोलन परिषद मुंबई येथे व त्यानंतर दिल्ली येथे तिसरी आंदोलन परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यासाठी महाराष्ट्र राज्यातील 500 ते 600 कार्यकर्त्यांसह वेगवेगळ्या राज्यातील प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. याबरोबरच यामध्ये भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे उपाध्यक्ष डॉ. बालाजी कोंपलवार व सचिव अशोक सब्बन, इतर राज्यातील तरुण उप्पल (जम्मू), मनीष ब्रम्हभट्ट (गुजरात), ईश्वरचंद त्रिपाठी (म.प्रदेश), भोपाल सिंह चौधरी (उत्तराखंड), सुनील लाल (उ.प्रदेश), चिकनावट (कर्नाटक), करनवीर (पंजाब), पुनमचंद साहू (छत्तीसगढ) यांच्यासह मामा फडतरे, दत्ता आवारी , तात्या चिंचकर उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post