काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निवड, मलिकार्जुन खर्गेनी केली अधिकृत घोषणा
माय नगर वेब टीम
मुंबई- आज सर्वोच्च न्यायालयाने भाजपला दणका बसला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी उद्या(27 नोव्हेंबर) सध्याकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ भाजपला देण्यात आली आहे. यादरम्यान, उद्याची रणनिती ठरवण्यासाठी मुंबईतील जे. डब्ल्यू. मॅरिएटमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक होत आहे. यावेळी काँग्रेसची जेष्ठ नेते मलिकार्जुन खर्गे आमदारांना मार्गदर्शन करत आहेत.
यावेळी त्यांनी काँग्रेसच्या गटनेतेपदी महाराष्ट्र काँग्रेसची अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे. याधी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्या गटनेत्याची निवड केली होती, पण काँग्रेसने आज आपला गटनेता निवडला.
Post a Comment