विधानसभा हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालीदास कोळंबकर यांची नियुक्ती


माय नगर वेब टीम
मुंबई - विधानसभा हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालीदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हंगामी अध्यक्षपदासाठीबबनराव पाचपुते, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, के सी पडवी आणि दिलीप वळसे पाटील यांच्या नावांची चर्चा होती. परंतु अखेरीस कालीदास कोळंबकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
विधानसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंतकाही काळासाठी हंगामी अध्यक्षांची नियुक्ती केली जाते. राज्यपाल ही निवड करतात. विधानसभा अध्यक्ष निवडून आल्यावर हंगामी अध्यक्षांचे कामकाज आपोआपसंपुष्टात येते.
नियम आणि कायद्यानुसार सभागृहातील सर्वात ज्येष्ठ आमदाराची हंगामी अध्यक्षपदी निवड करावी लागते. सामान्यत: विधानसभा सदस्यांना शपथ देणे हे हंगामी विधानसभा अध्यक्षांचे काम असते. तर फ्लोर टेस्ट विधानसभा अध्यक्षांसमोर होते. परंतु काही परिस्थितीत कोर्टाच्या आदेशावरून प्रोटेम स्पीकरसमोर देखील फ्लोर टेस्ट केले जाते. यापूर्वीही असे घडले आहे. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा सचिवालयाने 17 वरिष्ठ आमदारांची यादी राजभवनात पाठविल्याचे सांगितले जात होते. या यादीत भाजपच्या आमदारांमध्ये हरिभाऊ बागडे, बबनराव पाचपुते आणि कालिदास कोळंबकर यांची नावे होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post