सोमवारपासून बँकांच्या वेळात बदल
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - भारतीय बँकिंग संघटनेने बँकांच्या कामाच्या वेळेत बदल केला आहे. तो रविवारपासून (१ डिसेंबर) लागू केला असला तरी रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने प्रत्यक्षात सोमवारपासून (२ डिसेंबर) त्याची अंमलबजावणी होणार आहे.
राज्यस्तरीय बँकर्स समितीने 'आयबीए'चा आदेश व जिल्हा बँक व्यवस्थापनाने प्रत्येक सार्वजनिक बँकेने सुचवल्यानुसार बँकांच्या कामकाज वेळात बदल केला आहे. या नव्या बदलानुसार जिल्ह्यातील सार्वजनिक बँकांच्या व त्यांच्या जिल्हाभरातील सर्व शाखांच्या कामकाजाच्या वेळा आता सकाळी १० पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहेत. यात विविध कामानिमित्त येणाऱ्या ग्राहकांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतची वेळ असणार आहे. केवळ, शिर्डी व शनिशिंगणापूर येथील बँकांची व शाखांची वेळ सकाळी ११ पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील व यात ग्राहकांसाठीची वेळ सकाळी ११ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यत राहील, असे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अग्रणी जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.
Post a Comment