माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील शिवतीर्थावर भव्य-दिव्य अशा सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहला पार पडला. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी शिवरायांचे आणि जिजामाताचे आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री पदाचा पभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र आणि वरळीले आमदार अदित्य ठाकरेही होते. उद्धव यांच्या स्वागतासाठी मंत्रालय सज्ज झालं होतं. यासोबतच शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेतेही उपस्थित होते.
पदभार स्वीकारण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे हुतात्मा स्मारकावर गेले. तिथे त्यांना हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार असल्यामुळे मंत्रालयात सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. यासोबतच कडेकोट बंदोबस्त ही होता. मागील एक ते दिड महिन्यांपासून ओसाड पडलेले मंत्रालय आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी गजबजले होते. यावेळी हजारो शिवसैनिक आपल्या नेत्याला मुख्यमंत्रिपदी विराजमान होताना पाहायला आले होते.
महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुवारी शपथ घेतली. शिवाजी पार्कवर झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात ठाकरेंपाठाेपाठ सुभाष देसाई, एकनाथ शिंदे (शिवसेना), जयंत पाटील, छगन भुजबळ (राष्ट्रवादी) आणि बाळासाहेब थोरात, नितीन राऊत (काँग्रेस) या सहा मंत्र्यांनाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अनेक दिग्गज नेते उपस्थित हाेते.
Post a Comment