महाराष्ट्रासाठी आज ऐतिहासिक दिवस



माय नगर वेब टीम

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवाजी पार्कवर शपथ घेणार अाहेत. ठाकरे यांच्याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रत्येक दाेन नेत्यांना राज्यपाल मंत्रिपदाची शपथ देतील.

या सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री असेल, ते पद राष्ट्रवादीकडे असेल. तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास अाघाडीच्या बुधवारी रात्री बैठकीनंतर दिली.


महाराष्ट्र विकास अाघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरेंची मंगळवारी निवड करण्यात अाली हाेती. बुधवारी सकाळी ठाकरेंनी पत्नी रश्मी यांच्यासह राजभवनावर जाऊन राज्यपालांना शपथविधी साेहळ्याचे निमंत्रण दिले. ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत राज्यपालांनी दिलेली अाहे. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार हाेईल. काेणत्या पक्षास किती मंत्रिपदे याविषयी अाघाडीच्या बैठकीत सुमारे तीन तास खल झाला. संभाव्य मंत्र्यांची नावे मात्र जाहीर करण्यास अाघाडीच्या नेत्यांनी नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी १५ तर काँग्रेसला १३ मंत्रिपदे मिळणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post