उद्या उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ





माय नगर वेब टीम
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच कुणी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पत्र दिलं आहे. उद्या गुरुवारी(दि.28) रोजी सायंकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेतील. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. अनेक अडथळ्यांनंतर शिवसेना आज पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आली आहे. आणि ती ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली.

उद्धव ठाकरे यांची राजकीय कारकीर्द
59 वर्षांच्या उद्धव ठाकरेंसाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. नव्वदच्या दशकात उद्धव ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला. 1985 साली शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर ताबा मिळवला. या निवडणुकीपासून त्यांनी शिवसेनेच्या निवडणूक कॅम्पेनिंगमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. दैनिक सामनाचा पाया महाराष्ट्राभर भक्कम करण्यातही उद्धव ठाकरेंचा वाटा मोलाचा वाटा होता. पण असं असलं तरी त्यांनी त्या काळात राजकीय जीवनात प्रवेश केला नव्हता. किंबहुना बाळासाहेबांचा लाडका 'डिंगा' आणि ठाकरे परिवाराचा 'दादू' भविष्यात राजकारणाच्या वाटेनं जाईल, असा विचार त्या काळात कुणाच्याही मनात डोकावला नव्हता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post