वर्षा बंगल्यावर जाण्याबाबत उद्धव ठाकरेंनी दिले हे उत्तर
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - उद्धव ठाकरेंनी आज मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मुख्यमंत्र्यांना शासनाच्या 'वर्षा' या बंगल्यावर राहायला जावे लागते. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव 'वर्षा' बंगल्यावर जाणार का ? याबाबत विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले आहे.
तुम्ही वर्षा बंगल्यावर जाणार का ? असा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे. मातोश्री या नावातच सर्व काही आहे. मात्र एखादी जबाबदारी स्वीकारल्यानंतर ती पार पडण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात. ते काम मी करणार. वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा मी जाणार असल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विधीमंडळ पत्रकार संघासोबत संवाद साधला. मी अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री झालो. ठाकरे कुटुंबाने स्वतःसाठी कधीच असे काही प्रयत्न केले नाही. माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आली. ती मी स्वीकारली. मोठी आव्हानं पाहून मी पळालो नाही. पळालो असतो मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हणून घेण्यास पात्र ठरलो नसतो, असे ते यावेळी म्हणाले.
Post a Comment