मंत्रालयात झळकली ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावाची पाटी
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज दुपारी उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारतील. उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारण्याआधीच त्यांच्या दालनावरील पाटी बदलण्यात आली आहे.
आता या पाटीवर ‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव दिसणार आहे. विशेष म्हणजे मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनावरील ‘पाटी विविध फुलांनी सजवण्यात आली आहे.
मराठी भाषेतील पाटी सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसून येत आहे. त्यातच या पाटीभोवती विविध रंगबेरंगी फुलांची आरास घालण्यात आली आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेत महत्वपूर्ण निर्णय घेतले.
Post a Comment