जानेवारीपासून जिल्ह्यात 1 हजार 684 सहकारी संस्थांच्या निवडणुका
माय नगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा सहकारी बँकेसह जिल्ह्यातील लहान-मोठ्या पतसंस्थांसह, दूध संघ यासह अन्य 1 हजार 684 सहकारी संस्थांच्या निवडणुका जानेवारी ते डिसेंबर 2020 मध्ये पार पडणार आहेत. या सर्व संस्थांची मुदत या काळात संपणार असून त्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तयार केली आहे.
विधानसभा निवडणुकीचा गोंधळ संपतो ना संपतो तोच जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यात जिल्हा बँक, नगर शहरातील काही नागरी बँकांसह, 1 कोटीपेक्षा अधिक भाग भांडवल असणार्या संस्था ते मजूर संस्था यांचा देखील यात समावेश आहे. जानेवारी ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपणार्या अ ते ड वर्गातील संस्थांची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तयार केली आहे.
जिल्ह्यात ‘अ’ वर्गात जिल्हा बँक ही एकमेव संस्था असून उर्वरित संस्था, बँका, पतसंस्था, दूध संघ या ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्गात मोडतात. ‘ब’वर्गात मोडणार्या संस्थांमध्ये विभाग आणि राज्य स्तरात मोडणार्या विविध कार्यकारी संस्था, यासह 1 कोटींपेक्षा अधिक भागभांडवल असणार्या पतसंस्था, दूध, फेडरेशन यांचा यात समावेश आहे. येणार्या वर्षभरात होणार्या सहकार विभागातील सर्वाधिक निवडणुका या संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 246 असून, त्या खालोखाल 215 नगर तालुका तर सर्वात कमी निवडणुका या जामखेड तालुक्यात 45 होणार आहेत. होणार्या निवडणुकांची तयारी जिल्हा उपनिबंधक विभागाने केली असून मुदत संपण्याच्या आत त्याठिकाणी निवडणुका घेऊन त्याठिकाणी नव्याने संचालक मंडळ अस्तित्वात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अशा होणार निवडणुका
नगर 215, संगमनेर 246, अकोले 97, कोपरगाव 166, राहाता 108, राहुरी 147, श्रीरामपूर 54, नेवासा 115, शेवगाव 69, पाथर्डी 59, जामखेड 45, कर्जत 78, श्रीगोंदा 179 आणि पारनेर 106 या संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
Post a Comment