सरकारवर पवारांचा 'रिमाेट', राष्ट्रवादीसाेबत सत्तेत तरीही काँग्रेसला धास्ती शरद पवारांची
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या सत्तेत सहभागी हाेण्यास राजी असूनही काँग्रेस आपल्या सर्वात जुन्या सहयोगी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी धास्ती अाहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असले तरी या सरकारचा 'रिमाेट' शरद पवारांकडे गेल्यास आपल्या पक्षासाठी ते नुकसानकारक ठरू शकते, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटतेय.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी दिल्लीहून पृथ्वीराज चव्हाणांना २०११ मध्ये मुख्यमंत्री म्हणून राज्यात पाठवले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची एक- एक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून साेयीस्कररित्या माध्यमांपर्यंत पाेहाेचवली. तसेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या फाईल्सही दाबून ठेवल्या. परिणामी काँग्रेस- राष्ट्रवादीचे संबंध बिघडले. याच वादातून २०१४ मध्ये अाघाडी सरकारचा कार्यकाळ पूर्ण हाेत अालेला असताना राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढला. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. याच वादातून २०१४ मध्ये अाघाडी तुटली व दाेन्ही काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली. मात्र २०१४ मध्ये सत्तेतून पायउतार झाल्यानंतर देशभरात काँग्रेससमाेर भाजपचे तगडे अाव्हान निर्माण केले हाेते. २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे फक्त दाेन खासदार निवडून अाले. विधानसभा निवडणुकीतही अामदार संख्या घटली. त्यामुळे अाता माेदी- शहांच्या नेतृत्वाखाली भक्कम भाजपशी दाेनहात करायचे असतील तर समविचारी पक्षांसाेबत पुन्हा अाघाडी करायलाच हवी, असा सूर महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांमधून व्यक्त हाेऊ लागला. त्याला केंद्रीय नेतृत्वानेही परवानगी दिली. त्यामुळे २०१९ च्या लाेकसभा व विधानसभा निवडणुका दाेन्ही काँग्रेसने अाघाडी करुन लढवल्या. त्याचा लाेकसभेला फारसा फायदा झाला नसला तरी विधानसभेत नेतृत्वहिन काँग्रेसला अपेक्षेपेक्षा चांगला लाभ झाला. विधानसभेत ४४ जागा मिळवून चाैथ्या क्रमांकावर असूनही काँग्रेसला शिवसेना व राष्ट्रवादीच्या साथीने सत्तेत येण्याची संधी मिळाली. पण काँग्रेसला मिळालेल्या यशात त्यांच्या नेत्यांपेक्षा शरद पवारांचा वाटा जास्त अाहे. त्यातही अाता नव्या सरकारवर पवारांचाच 'रिमाेट' चालल्यास राज्यात राष्ट्रवादीचीच पाळेमुळे घट्ट हाेतील व काँग्रेसला भाजपबरोबर राष्ट्रवादीचाही सामना करावा लागेल, अशी भीती काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे.
Post a Comment