विनापरवाना शुभेच्छा फलक लावण्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतील लोखंडी बोर्डवर विनापरवाना वाढदिवसाचा शुभेच्छा फलक लावल्याप्रकरणी तोफखाना पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, महापालिका प्रभाग समिती क्रमांक 3 चे प्रभाग अधिकारी अशोक दत्तात्रय साबळे (वय 49, रा.मोहिनीनगर, दक्षिणमुखी मारुती केडगाव देवी, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, बुधवार (दि.27) रोजी सायंकाळी 5 वाजता ते प्रभागाची दैनंदिन पाहणी करीत असताना त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतील फलकावर नगर-औरंगाबाद रोड येथे एक विनापरवाना बेकायदेशिररित्या वाढदिवसाचा शुभेच्छा फलक लावलेला दिसून आला. या फ्लेक्सबोर्डबाबत अधिक माहिती घेतली असता या बोर्ड लावण्याबाबत कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती मिळाली. तसेच हा बोर्ड समदखान वहाबखान उर्फ पठाण, मोहसीन रफीक शेख, मुजिम अजिज खान (सर्व रा.मुकुंदनगर, अहमदनगर, पुर्ण पत्ता माहिती नाही) यांनी लावला असल्याचे समजले.
यावरुन अशोक साबळे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध महाराष्ट्र विरुपणास प्रतिबंध करण्याच्या अधिनियम 1985 चे कलम 3 अन्वये गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई तोफखाना पोलिस करीत आहेत.
Post a Comment