राज्यस्तरीय 100 व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मिळवले दोन सुवर्ण
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - येथील ट्रॅक रेसर्स स्पोटर्स फाऊंडेशनची खेळाडू व उद्धव अकॅडमी इंग्लीश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी दिव्यांगी कृष्णा लांडे हिने सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले. तीने 100 व 200 मीटर धावणे स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकाविले आहे.
दिव्यांगी लांडेची राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये ट्रॅक रेसर्स स्पोटर्स फाऊंडेशनच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. सुनिल जाधव, महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, नंदकुमार शितोळे, जयंत जाधव, नगर तालुका क्रीडा प्रमुख महेंद्र हिंगे, कृष्णा लांडे, नंदकुमार शितोळे, मार्गदर्शक दिनेश भालेराव, ऐश्वर्या कल्याणकर, विजयसिंह मिस्कीन, सचिन काळे व ट्रॅक रेसर्स स्पोर्टसचे सदस्य, खेळाडू व पालक उपस्थित होते.
राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे विभागाचे प्रतिनिधीत्व करताना तीने 12.6 सेकंदही विक्रमी वेळ नोंदवत 100 मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. तसेच 200 मीटर धावणे स्पर्धेत 26.9 सेंकद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण कामगिरीमुळे तिची दि.4 ते 7 डिसेंबर रोजी सुगुर (पंजाब) मध्ये होणार्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. उद्धव अकॅडमी इंग्लीश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी असून, ती इयत्ता 7 वी मध्ये शिकत आहे. तर वाडीयापार्क क्रीडा संकुल येथे ट्रॅक रेसर्स स्पोटर्स फाऊंडेशनचे मार्गदर्शक दिनेश भालेराव व ऐश्वर्या कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते. या अगोदर दिव्यांगीने अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत व तिच्या नावावर राज्य विक्रम सुद्धा आहे. या यशाबद्दल शिवछत्रपती पुरस्कार विजेते रंगनाथ डागवाले व प्राचार्य निशिगंधा यांनी तीचे आभिनंदन करुन पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
अहमदनगर मध्ये सिथेटिक ट्रॅकची सुविधा नसताना दिव्यांगी लांडे या विद्यार्थिनीने हे यश मिळवले आहे. पुणे-मुंबई सारख्या खेळाडुचे स्प्रिंट 100 मी. व 200 मी. वर वर्चस्व असते. पण नगर मधून ही कामगिरी करणारी ती प्रथम महिला खेळाडू ठरली आहे. योग्य सुविधा व क्रीडा साहित्य उपलब्ध झाल्या तर नगरला सुद्धा आंतरराष्ट्रीय पदक निश्चित मिळणार असल्याची भावना तिचे मार्गदर्शक दिनेश भालेराव यांनी व्यक्त केली.
Post a Comment