1976मध्ये आलेल्या 'कभी-कभी'मध्ये राखीचे कन्यादान करताना झळकले होते डॉ. हरिवंश राय आणि तेजी बच्चन
माय अहमदनगर वेब टीम
बॉलिवूड डेस्क - डॉ. हरिवंश राय बच्चन यांची 27 नोव्हेंबर रोजी 112 वी जयंती होती. 1907 मध्ये प्रयागराज येथे जन्मलेले हरिवंश राय बच्चन अमिताभ यांच्या 'कभी-कभी' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकले होते. याच चित्रपटात अमिताभ यांचे भाऊ अजिताभ हेदेखील झळकले होते. अजिताभ हे अमिताभ यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसले होते. तर चित्रपटात अमिताभ यांचे आईवडील तेजी बच्चन आणि हरिवंश राय हे पूजाची व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेत्री राखीचे आईवडील होते. ते राखीचे कन्यादान करताना दिसले होते.
बिग बी कायम वडिलांच्या कविता सोशल मीडियावर लिहितात...
अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या कवितांचा उल्लेख कायम त्यांच्या ब्लॉग, ट्विटर आणि फेसबुक पोस्टमध्ये करत असतात. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउटंवर वडिलांची कविता लिहिली आहे - "तुमने हमें पूज पूज कर पत्थर कर डाला, वे जो हम पर जुमले कसते हैं हमें जिंदा तो समझते हैं "- हरिवंश राय बच्चन
चित्रपटांमध्येही झाला उल्लेख
हरिवंश राय बच्चन यांनी लिहिलेल्या कविता गीतांच्या रुपात चित्रपटांमध्येही वापरण्यात आल्या आहेत. विशेषतः 1990मध्ये आलेल्या 'अग्निपथ' या चित्रपटात हरिवंश राय बच्चन यांनी लिहिलेली कविता खूप गाजली होती. 'अग्निपथ'च्या रिमेकमध्ये हृतिक रोशनसुद्धा हरिवंश राय बच्चन यांची कविता वाचून दाखवत असल्याचं पाहायला मिळालं.
Post a Comment