ऑस्ट्रेलियात धुळीचे वादळ, आकाश नारंगी, तापमान ४० अंश



माय नगर वेब टीम
सिडनी - ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतामधील मिल्डुरा शहरात ताशी ४० किमी वेगाने धुळीचे वादळ घोंगावू लागले आहे. त्यामुळे आकाश नारंगी बनले आहे. तापमान ११ अंशांनी वाढून ४० अंशांवर पाेहोचले आहे. या तापमानामुळे न्यू साऊथ वेल्स व क्वीन्सलँड प्रांतातील वनक्षेत्रात वणवा लागला होता. दृश्यमानता ४ किमीहून अर्ध्या किमीवर आली आहे. वाहनचालकांना रस्ते, इमारती नीटपणे दिसेनाशी झाली आहेत. लोकांना घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सोशल मीडियावर लोक म्हणाले, आपण मंगळावर आहोत, असे वाटू लागले आहे. गेल्या दहा वर्षांत ऑस्ट्रेलियात असे भयंकर वादळ पाहिले नव्हते. दम्यासारखे काही आजारांचा लोकांना त्रास जाणवू लागला आहे.
सतर्कतेचा इशारा, विलंब झाल्याची लोकांची तक्रार

प्रशासनाने मिल्डुरामध्ये अलर्ट जारी केला आहे. त्यावर लोक म्हणाले, आता घर सोडण्याची वेळ निघून गेली आहे. जवळील शहरे बॉन, स्ट्रॅथालन, इचुकामध्ये रेड कोड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचाच अर्थ येथील वादळाचा वेग वाढू शकतो.

१० वर्षांपासून दुष्काळाची छाया
> व्हिक्टोरिया प्रांतात १० वर्षांपासून दुष्काळासारखी स्थिती आहे. धरणही केवळ ४६.६ टक्के भरले. गेल्या नोव्हेंबरमध्ये धरण ६४.४ टक्के भरला होते.

> यंदा ऑस्ट्रेलियात दुष्काळ, हवामान बदलावरून अनेक आंदोलने झाली. परंतु, पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले, वणव्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढलेले नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post