महाविकास आघाडीने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या होणार पुन्हा होणार सुनावणी
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली -राज्यपाल बी.एस. कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी केलेली नियुक्ती रद्द करावी, आणि 24 तासांत या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने शनिवारी सायंकाळी सर्वोच्च न्यायालयात संयुक्त याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मात्र कोर्टाने कोणताही निर्णय दिला नाही. उद्या पुन्हा सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने सांगितले.
महाविकासआघाडीच्या वतीने सुप्रीम कोर्टात बाजू मांडणारे कपिल सिब्बल यांनी रविवारी कोर्टाला त्रास दिल्या याबाबत दिलगिरी व्यक्त केली. विधानसभेतील बहुमताचा आकडा 145 आहे. निवडणूकपूर्व युतीला प्रथम संधी मिळते. परंतु निवडणूकपूर्व युती तुटली. आता आम्ही निवडणुकीनंतरच्या युतीवर अवलंबून आहोत असे सिब्बल म्हणाले.अभिषेक मनू सिंघवी राष्ट्रवादीच्या वतीने आपली बाजू मांडत आहेत.
घोडेबाजार रोखण्यासाठी सरकार स्थापन झाल्यानंतर 24 तासांच्या आत फ्लोर टेस्ट करावी, अशी मागणी या तिन्ही पक्षांनी केली आहे. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती एनव्ही रमना, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना या याचिकेवर सुनावणी करत आहेत. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सरकारच्या वतीने उपस्थित आहे.
Post a Comment