जुन्या भांडणाच्या कारणावरुन खुनाचा प्रयत्न
माय अहमदनगर वेेेब टीम
अहमदनगर – जुन्या भांडणाचा मनात राग धरुन दोघांनी एकास धारदार हत्त्याराने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना लालटाकी परिसरातील भारस्कर कॉलनी येथे मंगळवारी (दि.26) रात्री 8.30 वा. घडली.
भारस्कर कॉलनीतील खंडागळे व नेटके यांच्यामध्ये काही दिवसांपुर्वी भांडणे झाली होती. त्या भांडणाचा मनात राग धरुन दया उर्फ बोंदू मच्छिंद्र नेटके (वय 22), हरिष उर्फ कोंड्या मच्छिंद्र नेटके (दोघे रा.भारस्कर कॉलनी, लालटाकी) यांनी तात्या हरि खंडागळे (वय 68) यांचा मुलगा प्रकाश तात्या खंडागळे यास अडवून शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दया नेटके याने हातातील धारदार हत्त्याराने प्रकाशच्या उजव्या बरगडीजवळ मारुन त्यास गंभीर जखमी करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. हरिष याने लाथाबुक्क्याने मारहाण केली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी तात्या खंडागळे याच्या फिर्यादीवरुन भादविक 307, 323, 504, 506, 34 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
Post a Comment