ओटीपोटात वेदना असेल तर दुर्लक्ष करू नका, सल्ला घ्या
माय नगर वेब टीम
हेल्थ डेस्क - पोटात दुखत असले तर काहीतरी चरबट खाल्ले असशील म्हणून पोटात दुखत असेल, असे अापण नेहमी विचार करताे. पोटदुखी थांबवण्यासाठी काहीतरी घरगुती उपचार करताे किंवा मेडीकल दुकानातून औषध आणताे. अगदी ओटीपोटात वेदना होत असतील तरी साधी पोटदुखी म्हणून आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र ओटीपोटात वेदना होणे म्हणजे साधी पोटदुखी नाही, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात.
ओटीपोटात वेदना होण्याची सामान्य कारणे
गॅस, उलटी, मलावरोध, पोटातल्या स्नायूंवर ताण, मासिक पाळी, फूट इंटोलेरेन्स, असिड रिफ्लेक्स
डाॅक्टर सांगतात... ओटीपोटात वेदना होण्याची अनेक कारणे आहेत. तिखट खाणे, मद्यपान करणे, धूम्रपान या सवयी ओटीपोटात दुखण्यासाठी कारणीभूत ठरतात. अन्न विषबाधा, जास्त ताप, इरिटेबल बाऊल सिंड्रोम, कॅन्सर, अल्सर असल्यास ओटीपोटात दुखते.
सामान्य कारणांमुळे ओटीपोटामध्ये दुखते. अशा वेळी आराम केल्यास किंवा ओव्हर द काऊंटर औषधे घेतल्यास बरे वाटते. मात्र तरीदेखील ओटीपोटातील वेदना थांबत नसतील तर हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते.
या आजारात होतात ओटीपोटात वेदना
गॅस्ट्रोएंटेरायटिस, इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS), गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रोइसोफेगेल रिफ्लेक्स डिसीज (GERD), पोटातील अल्सर किंवा पेप्टीक अल्सर, क्रोहन डिसीज, सेलिअक डिसीज
युरिनरी ट्रॅक आणि ब्लॅडर इन्फेक्शन
ओटीपोटातल्या वेदनांकडे दुर्लक्ष केल्यास इन्फेक्शन होऊ शकते, मलावरोधाची समस्या उद्भवू शकते. यामुळे आतड्यांना सूज येऊ शकते. ओटीपोटातल्या वेदनांसह मळमळ, शौचास साफ न होणे, डोकेदुखी आणि ताप अशी लक्षण आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
ओटीपोटातील वेदनांसह खालील लक्षणे दिसल्यास गांभीर्याने घ्या
वजन कमी होणे, अशक्तपणा, मलावरोध, डायरिया, शौचातून रक्त, योनीतून जास्त स्राव, औषधं घेतल्यानंतरही तीव्र वेदना, ताप, एकाच ठिकाणी वेदना, वारंवार उलटी, उलटीतून रक्त पडणे, लघवीला न होणे, चक्कर येणे.
Post a Comment