माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शालेय जीवनात अभ्यासाबरोबर खेळालाही महत्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. खेळामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक व बौद्धीक वाढ होते. त्यामुळे मुलांनी नियमित मैदानी खेळ खेळले पाहिजे. खेळात हार-जीतचा विचार न करता खिलाडूवृत्तीने खेळ खेळला पाहिजे. मेहनत व कष्टाच्या जोरावर खेळाडूही नाव कमावू शकतो, हे सध्या होत असलेल्या लिग स्पर्धांवरुन दिसून येते. संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभागी करत असतो. अनेक विद्यार्थ्यांनी शहर व जिल्हा क्रीडा स्पर्धात यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्थेच्यावतीने सर्वोतोपरि प्रयत्न केले जात आहेत. सर्व शिक्षकही उपक्रमशिल असल्याने विद्यार्थीही विद्यालयाचे नाव उंचावत आहे, असे प्रतिपादन शिशु संगोपन संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा यांनी केले.
शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, विश्वस्त अॅेड.विजय मुनोत, एल.के.आव्हाड, मनसुखलाल पिपाडा, मुख्याध्यापिका योगिता गांधी, जयश्री उंडे आदिंसह शिक्षकवृंद उपस्थित होते.
याप्रसंगी उपाध्यक्ष दशरथ खोसे म्हणाले, विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देऊन त्यांना खेळण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळाल्यास ते प्रगती करु शकतात. आज विविध खेळाला आणि खेळाडूंनाही महत्व आले आहे. त्यामुळे आजचा विद्यार्थी हा भविष्यात चांगला खेळाडू म्हणूनही नाव लौकिक मिळू शकतो. विद्यार्थ्यांनीही आपल्या आवडत्या खेळात जास्त मेहनत घेऊन कष्ट केल्यास यश नक्कीच मिळेल, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांनाच्या खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळते. अभ्यासबरोबरच खेळालाही तितकेच महत्व आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नियमित खेळाचे तास घेऊन विद्यार्थ्यांना प्रेात्साहन दिले जात असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.जी.शेख यांनी केले तर आभार निता लांडगे यांनी मानले.
Post a Comment