162 आमदारांच्या समर्थनाचे पत्र राज्यपालांना सुपूर्द; शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा



माय नगर वेब टीम
मुंबई - सत्ता स्थापनेवरून वाद सुरू असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या 162 आमदारांच्या समर्थनाचे पत्र सोमवारी राज्यपालांना सुपूर्द केले. महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागल्यानंतर भाजपने स्वतः मान्य केले होते की त्यांच्याकडे बहुमत नाही. तरीही बहुमत नसताना सीएम पदाची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीची पायमल्ली केली असे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सोबतच, फडणवीस यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post