महिलांनी असे व्यायाम करू नयेत?




माय नगर वेब टीम

महिलांचे व्यायाम करणे आणि जीममध्ये जाणे तसेच पुरुषांचे व्यायाम करणे आणि जीममध्ये जाणे यामध्ये मोठा फरक असतो. कोणताही पुरुष बॉडीबिल्डिंगसाठी जीममध्ये जातो. त्याला पोलादासारखे सक्त स्नायू तयार करायचे असतात. परंतु महिलांचे तसे नसते. त्यांना सक्त स्नायू नको असतात. म्हणून काही महिला जीममध्ये गेल्यानंतर वजन उचलण्यासारखे व्यायाम टाळायचा प्रयत्न करतात. कारण आपण पुरूषांसाठी असलेले हे व्यायाम केले तर आपला नाजूकपणा जाऊन आपले स्नायू पुरूषांसारखे होतील असे त्यांना वाटते. मात्र या संबंधातील तज्ञांनी या बाबत एक इशारा दिला आहे. महिलांनी कोणते व्यायाम टाळावेत याचा निर्णय स्वतः घेऊ नये. अशी त्यांची सूचना आहे.

महिलांनी वजन उचलण्याचा व्यायाम केला तर त्यांचे स्नायू पुरूषांसारखे होतील हा गैरसमज आहे. कारण कितीही व्यायाम केला तरी महिलांचे स्नायू पुरूषांसारखे सक्त होत नाहीत. कारण त्यासाठी आवश्यक असलेले विशिष्ट पुरूषी हार्मोन्स महिलांच्या शरीरात मुळातच नसतात. त्यामुळे त्यांनी वजन उचलण्याचा व्यायाम टाळू नयेत. अशा व्यायामांनी त्यांची हाडे मजबूत होत असतात. मात्र महिला असे व्यायाम टाळतात आणि त्यांची हाडे ठिसूळ राहतात.

व्यायामाच्या संदर्भात महिलांच्या मनामध्ये असे अनेक गैरसमज असतात. महिला घरकाम भरपूर करतात आणि हे घरकाम करताना त्यांना भरपूर व्यायाम होतो. त्यामुळे त्यांना वेगळा असा व्यायाम करण्याची काही गरज नाही. असा विचार अनेक महिला करत असतात. पण हाही विचार चुकीचा आहे. घरकाम म्हणजे व्यायाम नव्हे. मुळात आजच्या बहुतेक महिलांना फार घरकाम करावे लागतच नाही आणि लागले तरी या घरकामातून व्यायामाचे फायदे होत नाहीत. घरकाम करताना वाकावे लागते, थोड्या हातांच्या पायांच्या हालचाली होतात. एवढ्या हालचालींनी वजन आटोक्यात राहू शकेल, पचनशक्ती सुधारेल परंतु पोटाला, हृदयाला, पाठीला अशा सर्व अवयवांना घरकामाने व्यायाम होत नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post