माय अहमदनगर वेब टीम
अहंमदनगर - केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजना, शहर भुयार गटर योजना, फेज-2 च्या कामाची गती देवून तीन्ही प्रकल्प मार्च पर्यत पूर्ण करण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी प्रशासनाला दिले.
केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजना तसेच शहर भुयार गटर योजनेच्या कामाची सद्यस्थितीबाबत माहिती घेण्याच्या दृष्टिने व प्रकल्पास गती देण्याच्या दृष्टिने महापौर श्बाबासाहेब वाकळे यांनी बैठक घेतली. यावेळी उपमहापौर सौ.मालनताई ढोणे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सौ.लताताई शेळके, उपसभापती सुवर्णाताई गेणप्पा, नगरसेवक राहुल कांबळे, उपायुक्त प्रदिप पठारे, अजय चितळे, संजय ढोणे, सतिष शिंदे, सुरेश शेळके, यंत्र अभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख एम.डी.काकडे, अभियंता गणेश गाडळकर, सदाशिव रोहोकले, आर.जी.सातपुते, मजीप्रा. चे उपअभियंता अजय मुळे, आर.श्री.खाजेकर, जे डी बिलाल, आर जी चौधरी, एस एस बडे, शोननचे इंजि. दयानंद पानसे, ड्रीम कंन्स्ट्रक्शनचे पवन भावसार, तापी एजन्सीचे रितेश आगरवाल, पार्वती अग्रोचे शंकर खोत, किशोर कानडे, राजू व्यापारी आदी उपस्थित.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहर पाणी पुरवठा विषयक कामाची सद्यस्थितीची माहिती घेतली. पाणी पुरवठा योजनेचे राईझिंग पाईप अंथरण्याचे काम 560 मीटर पर्यत पूर्ण करण्यात आले. त्या बाबतचे 62 टक्के काम पूर्ण करण्यात आले. दूध डेअरी ते वडगांव गुप्ता पर्यतचे 4 कि.मी चे काम पूर्ण झाले. संपवेलचे पीसीसी व फुटींगचे काम पूर्ण करण्यात आले. एमएस पाईप अंथरणेचे काम 163 मी. पूर्ण झाले. मुळा नगर येथील दोन गेटचे काम जास्त पाणी असल्यामुळे करता येत नाही. ते काम पाण्याचे उन्हाळी आवर्तन झाल्यानंतर पूर्ण करण्यात यावे. एमजीपी कडून कामाबाबत लेखी माहिती घ्यावी. जेणे करून कामास गती येईल. वसंत टेकडी येथील जीएसआर टाकीचे स्लॅबचे काम सुरू आहे. याबाबत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी ज्या ठिकाणी लाईन टाकणेस अडचण नाही अशा भागात पाईप लाईन टाकण्याच्या सुचना दिल्या. तसेच ज्या भागात अडचणी असतील अशा ठिकाणी शेतक-यांशी चर्चा करून अडचणी सोडविण्यात येतील. परंतु कामास गती देवून एक महिन्यात एक कि.मी.चे काम होईल याबाबत कामास गती देण्यात यावी. जलशुध्दीकरण केंद्राचे काम फेब्रुवारी पर्यत पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या. वसंत टेकडी येथील टाकीचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या. पाईप लाईन टाकण्यासाठी शेतकरी यांची अडचण येत असेल तर जागेचे पंचनामे करून लाईन टाकण्यात यावी. पाटबंधारे विभागाची काही ठिकाणी अडचण असल्यास तात्काळ पत्र व्यवहार करण्यात यावा.
भुयारी गटर योजनेतील ड्रेनेज पाईप चे डायमीटर बदलणे बाबतचे काम लवकरात लवकर करून पाईप लाईनचे काम सुरू करावे. पंपीग स्टेशनसाठी आवश्यक असणारी जागा येत्या आठ दिवसात ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही करावी. नगररचना विभागाने यासाठी पुढील पुर्तता करून जागा ताब्यात दयावी. त्याठिकाणी देखील कामास सुरूवात करण्यात यावी. शहरामध्ये आवश्यक ठिकाणी पाईपचे डायमीटर बदलणे बाबतचे डिझाईन मजीप्रा यांनी तयार करून संबंधीत एजन्सीकडे देण्यात यावे व त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करावी. दोन्ही कामास गती देण्याच्या दृष्टिने मजीप्रा यांनी संबंधीत एजन्सीकडून काम करून घ्यावे.
फेज-2 चे एचडीपी पाईप राहिलेले अंथरण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. जलदाब चाचणीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. 118 कि.मी. राहिलेले काम 8 जानेवारी पर्यत पूर्ण करून टेस्टींग घेण्यात यावे. पाईप अंथरणे , जोडणे, केलेली खोदाई एमजीपी व मनपा अभियंता यांनी तपासून घेवून कारवाई करावी. एचडीपी पाईप आवश्यक त्या साईज नुसार उपलब्ध करून देण्यात यावे. कामाची गती वाढविण्यासाठी टिम वाढवून काम पूर्ण करण्यात यावे. नाहीतर वेळेत काम पूर्ण झाले नाही तर दंड वाढविण्यात येईल असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.
Post a Comment