ईशा केसकरने मालिकेसाठी घटवले वजन
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं’ असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय.
आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, ‘स्वावलंबी’ राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी ‘नखरेल’ शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. या मालिकेत शनायाची व्यक्तिरेखा साकारणारी ईशा केसकर हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच स्थान निर्माण केलं आहे. पण ईशाच्या चाहत्यांना हि गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल कि शनायाच्या भूमिकेसाठी ईशाने चक्क ११ किलो वजन कमी केलं.
त्याबद्दल बोलताना ईशा म्हणाली, “चित्रीकरणाच्या या बिझी शेड्युलमध्ये फिट राहण्यासाठी खूप काही करायला मिळत नाही. मात्र मला वेळ मिळतो तेव्हा मी जिमला जाते, तसेच चालायला आणि पळायला जायला मला फार आवडते. त्यामुळे मला जास्त ताजेतवाने वाटते.
झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया ही भूमिका मी साकारली तेव्हा मला तब्बल ११ किलो वजन कमी करावे लागले. ही भूमिका स्वीकारल्यानंतर माझ्या शरीरयष्टीमध्ये झालेल्या बदलात मी किंचितसाही फरक पडू दिला नाही. याचे कारण म्हणजे व्यायाम आणि उत्तम डाएट.”
Post a Comment